'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य

Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 7, 2024, 07:42 PM IST
'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य title=

Mohammed Shami on Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीचा सामना करतोय. दुखापतीमुळे भारत-इंग्लंड मालिकेतूनही (Ind vs Eng Test Series) त्याला बाहेर व्हावं लागंल. यादरम्यान मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  क्रिकेटमधून कधी निवृत्त (Retirement) होणार याबाबत शमीने माहिती दिली आहे. या दिवशी मला वाटेल की क्रिकेटचा उबग आला आहे, त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन असं शमीने म्हटलं आहे. नेटवर्क-18 ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे. 

नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC ODI World Cup 2023) मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत कधी झाली याचा खुलासा त्याने केलेला नाही. पण या दुखापतीमुळे तो भारतीय संघातून सध्या बाहेर आहे. मोहम्मद शमी भारतीय संघात कधी परतणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

या दरम्यान आता त्याने थेट निवृत्तीबाबत वक्तव्य केल्याने चाहते हैराण झाले आहेत. शमीने दिलेल्या मुलाखतीत 'कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त ताण घेण्याची गरज नाही, याबाबत मला कुणी सांगतही नाही आणि माझ्या कुटुंबाने यावर कधी चर्चा केली आहे. ज्या दिवशी मला मैदानावर जावसं वाटणार नाही. त्या दिवशी मी स्वत: ट्विट करुन निवृत्तीची घोषणा करेन असं शमीने स्पष्ट केलं आहे. 

बायोपीकवर काय म्हटला?
मोहम्मद शमीच्या संघर्षावर बायोपिक येणार असल्याचीही चर्चा आहे. शमीच्या चित्रपटात कोणता अभिनेता काम करणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. पण शमीने स्वत:च यावर उत्तर दिलं आहे. माझ्यावर आयुष्यावर चित्रपट येईल. या चित्रपटासाठी अभिनेता सापडला नाही तर मी स्वत: या चित्रपटात भूमिका साकारेन असं शमीने म्हटलं आहे. 

विराट की रोहित कोण धोकादायक फलंदाज?
विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा धोकादायक फलंदाज असल्याचं मोहम्मद शमीने या मुलाखतीत सांगितलं आहे. विराट कोहली मैदानात प्रेमाने प्रत्येक शॉट खेळतो. तर रोहित जितका वेळ मैदानावर असतो खूप वाईट पद्धतीने गोलंदाजांची पिसं काढतो असं शमीने म्हटलंय. तसंच कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी फेव्हरेट असल्याचं शमीने सांगितलं आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकल्यात. अशी कामगिरी क्वचितच एखादा कर्णधार करु शकेल असंही शमीने सांगितलं.