Shikhar Dhawan : टीम इंडियाचा स्टार खेळाडू गब्बर उर्फ शिखर धवन आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण गेला अनेक काळ तो टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. आयीएलमध्ये शिखर धवन पंजाब किंग्सचं (Punjab Kings) नेतृत्व करतो. पण दुखापतमुळे तो बेंचवरच बसू आहे. यादरम्यान शिखर धवनबाबतच (Shikhar Dhawan) नवी चर्चा सुरु झाली आहे. याला कारण ठरलाय तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्याचा एक व्हिडिओ. ज्यामुळे शिखर धवन लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जातंय.
शिखर धवन नव्या भूमिकेत
वास्तविक शिखर धवनचा एक कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे, ज्यात तो कॉमेडीबरोबरच वेगवेगळ्या सेलिब्रेटींबरोबर संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा 50 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शिखर धवन अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटर ऋशभ पंत आणि हरभजन सिंगसारख्या स्टार्सबरोबर दिसतोय. शिखर धवनच्या या कार्यक्रमाचं नाव 'धवन करेंगे' असं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 20 मेपासून होणार आहे आणि जिओ सिनेमावर तो प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.
शिखर धवान क्रिकेटला अलविदा करणार?
शिकर धवनच्या या नव्या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जात आहे. शिखरचं वय आता 38 आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामनो तो तीन वर्षांपूर्वी खेळला होता. आता आयपीएलमध्येही त्याची कारकिर्द संपताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातो तो पंजाब किंग्सचा कर्णधार आहे, पण दुखापतीमुळे तो सुरुवातीचे केवळ पाच सामने खेळू शकला. त्याच्या गैरहजेरीत सॅम करन पंजाबचं नेतृत्व सांभाळतोय.
अभिनय क्षेत्रात कारकिर्द करणार
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 50 सेकंदाच्या व्हिडिओत शिखर कॉमेडी करताना दिसत आहे. त्याच्या बुद्धीमता आणि विनोद करणाच्या टायनिंगलाही चाहत्यांनी दाद दिली आहे. इंस्टाग्रामवरही धवन अनेकवेळा आपले कॉमेडी रिल्स शेअर करत असतो. त्याच्याकडे अनेक विनोदी किस्सांचा खजिना आहे. धवनच्या या कॉमेडी टॉक शोममध्ये अनेक दिग्गज क्रिकेटर्स सहभागी होणार आहेत.
शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द
शिखर धवन टीम इंडियासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे. आतापर्यंत तो टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 2315 धावा केल्या असून 7 शतकांचा समावेश आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात 6793 धावा त्याच्या नावावर आहेत. यात त्याने 17 शतकं ठोकलीत.