हैदराबाद : टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.
तर या व्हिडिओत तो एका वयोवृद्ध नागरिकाला धक्काबुक्की करताना दिसत आहे.
#WATCH: Cricketer Ambati Rayudu seen in scuffle with a man allegedly after argument over rash driving in Hyderabad (Unverified video source) pic.twitter.com/r1pdq5Lh9g
— ANI (@ANI) August 31, 2017
अंबाती रायुडू हा आपल्या आलिशान कारमधून संतापाने उतरतो आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर धावून जातो. त्यांच्यात बाचाबाचीही झाली आहे. त्यावेळी काही जण त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पुन्हा एकदा रायुडू त्या ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करतो, असं या व्हिडिओत दिसतं. भरधाव गाडी चालवण्यावर आक्षेप घेतल्यानं रायुडूचा तीळपापड झाल्याचं समजतं.
रायुडूनं ३४ वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून १०५५ धावा केल्यात. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्समधून खेळतो. याआधी २००५ मध्ये रायुडू आणि क्रिकेटपटू अर्जुन यादव यांच्यात रणजी सामन्यावेळी खेळपट्टीवरच धक्काबुक्की झाली होती.