Cristiano Ronaldo : रोनाल्डोला 24 तासात दुसरा झटका, आता नक्की काय झालं?

रोनाल्डोला 24 तासात दुसरी वाईट बातमी, खेळण्यावरच बंदी? वाचा सविस्तर!

Updated: Nov 23, 2022, 07:40 PM IST
Cristiano Ronaldo : रोनाल्डोला 24 तासात दुसरा झटका, आता नक्की काय झालं? title=

Cristiano Ronaldo Update : पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (cristiano ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबला गुडबाय केलाय. तात्काळ प्रभावाने त्याने क्लब सोडण्याचा निर्णय घेतलाय. क्लबनेही एक निवेदन प्रसिद्ध करुन याला दुजोरा दिलाय. रोनाल्डोने नुकतीच एक स्फोटक मुलाखत दिली होती. ज्यात त्यानं क्लबवर टीका केली होती. या मुलाखतीनंतरच क्लबसाठी खेळणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. मात्र अशातच त्याच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. (cristiano ronaldo banned for two matches marathi Sport news)

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कतारमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशनने (England Football Association) रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच त्याला 50,000 पाऊंडचा दंडही ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 49 लाख 1 हजार इतकी आहे. 

रोनाल्डोवर का कारवाई करण्यात आली?
यावर्षी एप्रिलमध्ये रोनाल्डाेने चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या एका सामन्यात पराभवानंतर तो परतत असताना एका चाहत्याच्या हातातील फोन त्याने खाली टाकला. यामुळे रोनाल्डोचा निषेध करण्यात आला होता त्यानंतर त्याने माफीसुद्धा मागितली होती. 

दरम्यान, मॅन्चेस्टर युनायटेड क्लबने रोनाल्डोला काल म्हणजेच मंगळवारी करारमुक्त केलं. ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांना दिलेल्या वादळी मुलाखतीमुळे त्याच्यावर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. आता रोनाल्डो कोणत्याही क्लबचा खेळाडू नसून वर्ल्ड कपमधील कामगिरी त्याला कोणता क्लब सामील करून घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.