कोलंबो : श्रीलंकन क्रिकेट टीमचा ओपनर बॅट्समन दनुष्का गुणथिलका याच्यावर खराब व्यवहार केल्याप्रकरणी सहा मॅचेस खेळण्यास बंदी घातली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरापर्यंत पार्टी केल्याने गुणथिलका प्रॅक्टिस सेशनमध्ये येऊ शकला नाही. तर, एकदा तो आपली किट बॅग न घेताच प्रॅक्टिस सेशनमध्ये पोहोचला होता. ही घटना श्रीलंके दौऱ्यावर भारत असताना घडली होती.
श्रीलंकन क्रिकेटच्या अधिकाऱ्यांच्या मते, टीम मॅनेजमेंटने चौकशीत दनुष्का गुणथिलका दोषी ठरला. त्यानंतर दनुष्कावर सहा मॅचेसची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाहीये.
दनुष्का गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्मात आहे आणि चांगला स्कोरही करत होता. पण, आता हा प्रकार घडल्याने श्रीलंकन क्रिकेट टीमला मोठा झटका बसला आहे. दनुष्काला पाकिस्तान विरोधातील वन-डे टीममध्ये सहभागी करण्यात आलेलं नाहीये.