मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्या दिवसापासून दोन बड्या टीमना मागे टाकत असेल तर गुजरात आणि लखनऊ दोन नव्या आलेल्या टीम. या दोन नव्या टीमने धुमाकूळ घातला आहे. पॉईंट टेबलवर या दोन्ही टीमने पहिले तीन क्रमांक सोडले नाहीत.
के एल राहुलच्या नेतृत्वामध्ये लखनऊ टीमचा राजस्थानने धोबीपछाड केला. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात 24 धावांनी पराभव झाला. लखनऊला या पराभवाचा मोठा फटका बसला. तर राजस्थानच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा वाढल्या. लखनऊ टीम आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
राजस्थान टीमचे 16 पॉईंट्स झाले आहेत. तर लखनऊचेही 16 पॉईंट्स झाले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. आता प्लेऑफची रेस खूप जास्त कठीण असणार आहे. दोन्ही टीमला आता 1-1 सामना जिंकणं आवश्यक आहे.
लखनऊचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं गणित काय?
जर लखनऊ टीम शेवटचा सामना जिंकू शकली नाही तरी प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकते. बंगळुरू, दिल्ली, पंजाब या तीन टीममध्ये स्पर्धा सुरू आहे. बंगळुरूकडे 14 पॉईंट्स आहेत जर ते एक सामना जिंकले तर 16 पॉईंट्स मिळतील आणि प्लेऑफसाठी दावेदार असल्याचं सिद्ध करतील.
दिल्ली आणि पंजाब टीमला प्रत्येकी 12 पॉईंट्स आहेत. त्यांना अजून प्रत्येकी 2 सामने जिंकणं गरजेचं आहे. एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर दोन्ही टीम एकाच वेळी जिंकू शकत नाहीत.
कोणतीही एक टीम दोन सामने जिंकली तर ती प्लेऑफपर्यंत पोहोचू शकले. जर बंगळुरूने शेवटचा सामना गमवला तर दिल्ली आणि पंजाबला प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
या टीम प्लेऑफमधून बाहेर
कोलकाता नाईट रायडस, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई या टीम प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर झाल्या आहेत. मुंबईने आयपीएलमध्ये 5 तर चेन्नईने 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर हैदराबादने 2-2 वेळा चॅम्पियनशिप मिळवली आहे.