'बस ना आता..' युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान पहिल्यांदा दिसली धनश्री, कॅमेरा समोर येताच...

Dhanashree Verma Spotted: धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यात लवकर घटस्फोट झाल्याच्या अफवा आहेत. आता या सगळ्यामध्ये धनश्री वर्मा दिसली.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 15, 2025, 10:27 AM IST
'बस ना आता..' युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान पहिल्यांदा दिसली धनश्री, कॅमेरा समोर येताच... title=

Dhanashree Verma Spotted: डान्सर धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. याला कारण म्हणजे क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट घेणार आहे. आजकाल अशी चर्चा आहे की, धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यामध्ये काही आलबेल नाही. लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा आहे. युजवेंद्र आणि धनश्रीने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले.

धनश्री वर्मा दिसली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

युजवेंद्र चहलनेही धनश्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. आता घटस्फोटाच्या अफवांमध्ये, धनश्री पहिल्यांदाच दिसली. पापाराझींना पाहून धनश्रीने त्यांना आणखी फोटो न काढण्याची विनंती केली. ती म्हणाली- "बस आता पुरे झाले". यादरम्यान धनश्रीचा स्टायलिश अवतार दिसला. धनश्री यावेळी पांढरा शर्ट आणि काळा स्कर्ट घातला होता. तिने उंच टाचांचे शूजही घातले होते. धनश्रीने मोकळे केस आणि काळ्या चष्मा अशा मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे. 

युजवेंद्र चहल बिग बॉस 18मध्ये दिसला

धनश्रीच्या आधी युजवेंद्र चहल बिग बॉस 18 च्या सेटवर दिसला होता. युजवेंद्र चहल श्रेयस अय्यर आणि शशांक सिंगसोबत दिसला. सलमान खान आणि स्पर्धकांसोबत त्याने खूप मजा केली. यासोबतच, श्रेयस अय्यरची पंजाब किंग्जच्या कर्णधारपदीही घोषणा करण्यात आली.

धनश्री वर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने झलक दिखला जा 11मध्ये प्रवेश केला. या शोमध्ये धनश्रीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. धनश्रीने तिच्या डान्सने सर्वांना आपले चाहते बनवले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी युजवेंद्र चहल देखील शोमध्ये आला होता. येथे त्याने धनश्री आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. युजवेंद्रने सांगितले की, तो धनश्रीला प्रेमाने भिंडी म्हणतो.