मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगळूरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीच्या दिनेश कार्तिकने राजस्थानच्या विजयाचा तोंडचा घास पळवला. तुफान फलंदाजी करत कार्तिकने बंगळूरूला विजय मिळवून दिलाच. या सामन्यात 23 बॉल्समध्ये 44 रन्स करत कार्तिक हिरो ठरला. तर गेले काही महिने टीम इंडियाचा भाग नसलेल्या कार्तिकने कालच्या सामन्यानंतर, अजून मी संपलेलो नाही अस विधान केलंय.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 170 रन्सचं बंगळूरला आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डुप्लेसी आणि अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशिप केली. यानंतर विराट कोहली आणि डेव्हिड विली स्वस्तात माघारी परतले.
बंगळूरू हा सामना हरणार तोच दिनेश कार्तिक संकचमोचन म्हणून आला आणि त्याने शाहबाज अहमदसोबत टीमला विजय मिळवून दिला.
या सामन्यात दिनेश कार्तिकला मॅन ऑफ द मॅचला खिताब देण्यात आला. यावेळी संजू सॅमसन म्हणाला, "मी सातत्याने मला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मला असंही वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये मी अजून चांगला खेळ करू शकत होतो. मी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. शिवाय यावेळी मी स्वतःला सांगितलं की, मी अजून संपलेलो नाही."
मी काही लक्ष्य ठरवलं आहे आणि मला ते गाठायचं आहे. जेव्हा तुम्हाला प्रति ओव्हर 12 रन्स करायचे असतात, त्यावेळी तुम्हाला इतर मार्गांचा विचार करावा लागतो. यासाठी शांत राहून तुम्हाला तुमच्या खेळाला समजणं फार गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही सामन्यात पुढे जाऊ शकता, असंही कार्तिकने सांगितलं.