ICC T20 World Cup 2022 : इंग्लंडने यंदाच्या वर्ल्ड कप जिंकत दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यामध्ये बेन स्टोक्स आणि सॅम करन यांनी चांगलं प्रदर्शन केलंच त्यांच्यासोबत आणखी एका खेळाडूने दमदार कामगिरी केली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर आदिल रशीद. धोकादायक बाबर आझमने अंतिम सामन्यामध्ये सेट झाला असं वाटत असताना रशीदने त्याचा अडथळा दुर केला होता.
आदिल रशीदने अंतिम सामन्यात संस्मरणीय कामगिरी केली होती. IPL 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. रशीदने आपल्या फिरकी गोलंदाजीने विराट कोहली आणि बाबर आझमसारख्या स्टार फलंदाजांना बाद केलं आहे. त्यामुळे या गोलंदाजावर अनेक फ्रँचायझी संघांची नक्कीच नजर असेल. हा स्टार क्रिकेटर इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावासाठी सज्ज झाला आहे.
रशीदने आपण यंदाच्या आयपीएलमध्ये लिलावासाठी नाव देणार असल्याचं सांगितलं आहे. रशीदने या स्पर्धेध्ये सहा सामन्यात चार बळी घेतले आहेत. मात्र अवघ्या 6.12 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना बांधून ठेवलं होतं. गोलंदाजीबद्दस रशीदने त्याचा मास्टरप्लॅन सांगितला.
बाबर आझमला मी गुगली चेंडूवर बाद केलं होतं. कमी वेगाने चेंडू टाकत होतो आणि खेळपट्टीची मला मदत मिळत होती. कारण चेंडू स्पिन होत होता त्यामुळे चेंडू कमी वेगाने टाकल्याचं रशीदने सांगितलं.