लंडन : महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताच्या तोंडांतून विजयाचा घास काढून घेतला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
२२९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताचा डाव २१९ धावांवर बाद झाला. इंग्लंडने अंतिम सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताचे पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरादाखल भारताला केवळ २१९ धावा करता आल्या. पूनम राऊतची ८६ धावांची खेळी व्यर्थ गेली. हरमनप्रीत कौरनेही ५१ धावांची खेळी केली.
अखेरच्या काही षटकांमध्ये सामन्याचा तणाव दोन्ही संघातील खेळाडूंवर तितकाच होता मात्र भारताच्या महिला क्रिकेटर्सनी अखेरच्या काही षटकांमध्ये झटपट विकेट गमावल्या आणि सामना हातातून निसटला.