एका नव्या युगाची सुरुवात...Rohit Sharma कर्णधार झाल्यानंतर फॅन्सची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Updated: Dec 9, 2021, 11:14 AM IST
एका नव्या युगाची सुरुवात...Rohit Sharma कर्णधार झाल्यानंतर फॅन्सची प्रतिक्रिया title=

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियामध्ये मोठे बदल केले आहेत. विराट कोहलीला वनडे फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. त्याच्या जागी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सोपवण्यात आली आहे. येत्या 2023 मध्ये होणारा वनडेचा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. 

सोशल मीडियावर चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहे. यामध्ये काहींनी कोहलीचं समर्थन केलं, तर काहींना बीसीसीआयचा हा निर्णय योग्य वाटला. 

वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा योग्य निर्णय असल्याचे मत बहुतांश चाहत्यांचं आहे. एका यूजरने लिहिले की, रोहितचा कर्णधार झाल्यामुळे मी खूप खूश आहे, पण कोहलीसाठी थोडे दुःख आहे. 2023 च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत ते थांबले असते.

बीसीसीआयला निर्णयाचा पश्चाताप होईल!

एका यूजरने कोहलीचा सिंहासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, राजा पुन्हा एकदा गर्जना करेल. तसंच, पोस्टमध्ये बीसीसीआयला हॅशटॅग करत तुमचा निर्णय चुकीचा आहे हे तुम्हाला लवकरच कळेल, असं लिहिलंय. त्याचवेळी आणखी एका यूजरने कोहलीसाठी लिहिलं की, जग काहीही म्हणो, तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील. 

एका नव्या युगाची सुरुवात

युजरने लिहिलं की, मला विश्वास आहे की कोहली आदरास पात्र आहे. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. नवीन जबाबदारीसाठी रोहितचं अभिनंदन आणि खूप काही केल्याबद्दल कोहलीचे आभार.