MS Dhoni : धोनीशी वाद झाल्यानंतर जडेजाचे CSK सोडण्याचे संकेत; पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

MS Dhoni : धोनी (MS Dhoni) त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.  धोनी आणि जडेजाचा व्हिडीओ व्हायरल ( Video Viral ) होत असून यामध्ये दोघांमध्ये काही ठीक नसल्याचा अंदाज आहे.

सुरभि जगदीश | Updated: May 22, 2023, 05:51 PM IST
MS Dhoni : धोनीशी वाद झाल्यानंतर जडेजाचे CSK सोडण्याचे संकेत; पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय title=

MS Dhoni : आयपीएलमध्ये सध्या चेन्नई सुपर किंग्जचं ( Chennai Super Kings ) नाव चांगलंच चर्चेत आहे. चेन्नईच्या टीमचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. फार क्वचितच धोनी ( MS Dhoni ) मैदानावर भांडताना दिसतो. तुम्ही आतापर्यंत धोनीला ( MS Dhoni ) कधीच आपल्या सहकाऱ्यांशी भांडताना पाहिलं नसेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) एकमेकांशी नाखुश दिसतायत. 

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) अंपायरशी बाचाबाची करताना दिसला. यावेळी धोनी अंपायरवर नाराज असल्याचं दिसून आलं. दरम्यान यानंतर धोनी आणि जडेजाचा व्हिडीओ व्हायरल ( Video Viral ) होत असून यामध्ये दोघांमध्ये काही ठीक नसल्याचा अंदाज लावण्यात येतोय. शिवाय यानंतर जडेजाने केलेलं एक ट्विट मात्र चर्चेचा विषय ठरतोय.  

धोनी आणि जडेजा यांच्यात बिनसलं?

आयपीएलमध्ये 67 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) यांच्यात खेळला गेला. हा सामना जिंकून चेन्नईने ( Chennai Super Kings ) प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं खरं मात्र यावेळी चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक वाईट गोष्ट समोर आलीये. या दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ पाहता, धोनी जडेजावर चिडला असल्याचं दिसतंय.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, रवींद्र जडेजाला धोनी नाराजीने काहीतरी समजावतोय. दुसरीकडे जडेजा देखील फार संतापाने धोनीशी बोलताना दिसून येतोय. दरम्यान यानंतर जडेजाने एक फोटो शेअर केलाय, ज्यानंतर जडेजा टीम सोडून जाणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत. 

जडेजाची ती पोस्ट चर्चेत

या घटनेनंतर जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. जडेजाने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं की, "तुमचं कर्म तुम्हाला परत मिळेल... लवकर किंवा नंतर ते नक्कीच परत मिळेल." कदाचित ही पोस्ट शेअर करून जडेजा CSK सोडण्याचे संकेत देत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. मात्र, या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.