मुंबई : बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (Icc T20I World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे. विशेष म्हणजे संघात कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं (Mahendra Singh Dhoni) कमबॅक झालंय. धोनीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनी टीम इंडियाचा मेन्टॉर (Mentor) म्हणजेच मार्गदर्शक असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( bcci Secretary jay shah) यांनी ही माहिती दिली आहे. बीसीसआयने याबाबतचं ट्विट केलंय. (former India Captain mahendra singh dhoni is mentor of team india for T20i World Cup informed bcci Secretary jay shah)
धोनीकडे महत्त्वाची जबाबदारी
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीच्या तिन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. धोनी या स्पर्धेसाठी मेन्टॉर असणार आहे. त्यामुळे धोनीचं मार्गदर्शन हे टीम इंडियासाठी मोलाचं ठरणार आहे. नेहमी मैदानात शांत डोक्याने रणनिती आखणारा धोनी आता मैदानाबाहेरुन टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर