मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मोठा निर्णय घेतला आहे. गांगुलीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच ट्विटमधून नव्या इनिंगला सुरुवात करणार असल्याचे संकेतही दिले आहेत. (former team india captain and bcci chief sourav ganguly planning new inning for help us people)
माझ्यासाठी 2022 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. मी क्रिकेट कारकिर्दीला 1992 मध्ये सुरुवात केली. आता मला करिअर सुरु करुन 30 वर्ष झाली आहेत. या 30 वर्षांच्या मोठ्या प्रवासात अनेकांचं सहकार्य लाभलं. क्रिकेटमुळे मला खूप काही मिळालं. आतापर्यंत ज्यांनी मला मदत केली मी त्या सर्वांचा आभारी आहे. आता लवकरच नव्या इनिंग्चा श्रीगणेशा करतोय. तुमच्या सर्वंचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे", असं दादाने ट्विटमध्ये नमूद केलंय.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह हे मे महिन्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी गांगुलीच्या घरी आमंत्रणावरुन जेवायला गेले होते. या भेटीची माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. या भेटीनंतर गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता या घोषणेनंतर गांगुलीच्या निर्णायकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022