नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेला लवकरच एक मोठा झटका लागू शकतो. टीमचा स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या कॉलपेक डील साईन केल्यानंतर आता हाशिम आमला देखील ही डील साईन करु शकतो.
इंग्लंडमधील अनेक काउंटी संघ आमलाला आपल्या संघात आणण्यासाठी उत्सूक आहेत. यामध्ये लंडनचा क्रिकेट क्लब सर्वात पुढे आहे.
आमला दक्षिण आफ्रिेकेचा खेळाडू आहे. जर तो संघ सोडून गेला तर याने दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागणार आहे. इंग्लंडमध्ये खराब कामगिरीनंतर आमला या डीलबाबत गंभीर असल्याचं बोललं जातंय.
आमला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार होऊ शकतो. कारण काउंटी क्रिकेटमध्ये खेळाडुंवर जास्त दबाव नसतो. आमलाची कामगिरी काही दिवसांपासून इतकी चांगली नाही राहिली आहे.