Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

राजीव कासले | Updated: Nov 3, 2023, 01:29 PM IST
Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं title=

IND vs SL Record, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. टीम इंडियाने (Team India) सलग सात सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान (India beat Sri Lanka) सामना झाला. यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 357 धावांचा डोंगर उभारला. तर श्रीलंकेचा संघ अवघ्या 55 धावात गडगडला. या विजयाबरोबरच टीम इंडिया सेमीफायनमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात अनेक विक्रमांचा नोंद झाली. मोहम्मद शमीने (Mohammad Shami) पाच विकेट घेतल्या. तर श्रेयस अय्यरने तब्बल सहा षटकार लगावले, या सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 11 विक्रमांची नोंद झाली आहे, 

विश्वचषकात सर्वाधिकवेळा 4 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीने अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकलं आहे 
मोहम्मद शमी - 7 वेळा
मिचेल स्टार्क -  6 वेळा
इमरान ताहिर -  5 वेळा

श्रीलंका संघ विश्वचषकात तिसऱ्यांदा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला
43 vs साउथ आफ्रीका, पर्ल, 2012
50 vs भारत, कोलंबो, 2023
55 vs भारत, मुंबई, 2023
55 vs वेस्टइंडीज, शारजाह, 1986
67 vs इंग्लंड, मॅनचेस्टर, 2014
73 vs भारत, तिरुवनन्तपुरम, 2023

एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा चार विकेट घेणारे गोलंदाज

4 - शाहिद आफरीदी, 2011
4 - मिचेल स्टार्क, 2019
3 - मोहम्मद शमी, 2019
3 - अॅडम झम्पा, 2023*
3 - मोहम्मद शमी, 2023*

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी
4 - मोहम्मद शमी
3 - जवगल श्रीनाथ
3 - हरभजन सिंह

विश्वचषकात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज
3   - मिचेल स्टार्क
3  - मोहम्मद शमी

विश्वचषकात आयसीसी सदस्य संघाची सर्वात कमी धावसंख्या
55 - श्रीलंका vs भारत, वानखेडे, 2023
58 - बांगलादेश vs वेस्टइंडीज, मीरपुर, 2011
74 - पाकिस्तान vs इंग्लंड, एडिलेड, 1992

एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथा सर्वात मोठा विजय
317 - भारत vs श्रीलंका, तिरुवनन्तपुरम, 2023
309 - ऑस्ट्रेलिया vs नीदरलँड्स, दिल्ली, 2023 (WC)
304 - झिम्बाब्वे vs UAE, हरारे, 2023
302 - भारत vs श्रीलंका, वानखेडे, 2023 (WC)
290 - न्यूजीलंड vs आयरलँड, अबेरदीन, 2008
275 - ऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तान, पर्थ, 2015 (WC)

भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोर
50 - श्रीलंका, कोलंबो, 2023 *
55 - श्रीलंका, मुंबई, 2023 (WC)
58 - बांगलादेश, मीरपुर, 2014
65 - झिम्बाब्वे, हरारे, 2005
73 - श्रीलंका, तिरुवनन्तपुरम, 2023

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
मोहम्मद शमी  -  45 विकेट
झहीर खान  -  44 विकेट
जवगल श्रीनाथ  -  44 विकेट
जसप्रीत बुमराह  -  33 विकेट
अनिल कुंबले  -  31 विकेट

विश्वचषकात एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय फलंदाज
7 - सौरव गांगुली vs श्रीलंका, टॉन्टन, 1999
7 - युवराज सिंह vs बरमूडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007
6 - कपिल देव vs झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स, 1983
6 - रोहित शर्मा vs पाकिस्तान, अहमदाबाद, 2023
6 - श्रेयस अय्यर vs श्रीलंका, वानखेडे, 2023

विश्वचषकात एकही शतक न करता हायेस्ट स्कोर करणारा संघ
357/8 - भारत vs श्रीलंका, मुंबई, 2023
348/8 - पाकिस्तान vs इंग्लंड, नॉटिंघम, 2019
341/6 - साउथ अफ्रीका vs यूएई, वेलिंग्टन, 2015
339/6 - पाकिस्तान vs यूएई, नेपियर, 2015
338/5 - पाकिस्तान vs श्रीलंका, स्वानसी, 1983