मुंबई : आयपीएल संपली असून टी -20 वर्ल्डकप सुरू झाला आहे. यामध्ये सर्वांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची. मात्र पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वाढल्यानं पाकिस्तान विरोधात प्रचंड रोष पसरला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच रद्द (Ind vs Pak T20 Match) करण्याची मागणी केली जात आहे.
काही चाहत्यांचा असं वाटतं की, हा सामना झाला पाहिजे. तर काहींचं म्हणणं आहे हा सामना अजिबात होऊ नये. या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चाही होत आहे. आम्ही त्यांना पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून त्यांना धडा शिकवू शकतो, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की भारताने हा सामना खेळू नये.
चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणतात की, भारताने पाकिस्तानसोबत सामने खेळू नयेत. आगामी टी -20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याचा पुनर्विचार करावा आणि तो रद्द करावा.
काश्मीरमध्ये यापूर्वी दहशतवाद्यांनी नऊ सैनिकांना ठार केलंय. अशा स्थितीत करोडो भारतीयांमध्ये या हत्यांबाबत संताप आणि दु:ख आहे. देशातील बहुतेक लोक पाकिस्तानविरुद्ध सामना न खेळण्याची मागणी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नाही तर त्याचे खूप नुकसान होईल. ते तोटे काय आहेत ते जाणून घेऊया.