Ind vs Aus Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship) निकाल लागणार आहे.त्यामुळे दोन्ही संघ मैदानात कसून सराव करतंय. ही मालिका टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) खुप महत्वाची असणार आहे. कारण या मालिकेचा निकाल रोहितच्या कर्णधारपदाचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे संपुर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप 2022 आणि T20 वर्ल्ड कप 2022 यांसारख्या मोठ्य़ा स्पर्धा जिंकण्याची संधी गमावलीय. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून घरच्या मैदानावर सुरू होणारी 4 सामन्यांची कसोटी मालिका गमावायची नाही.कारण ही मालिका गमावली तर टीम इंडिया जून 2023 मध्ये होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना खेळण्याची संधी गमावू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खुप महत्वाची असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका अग्निपरीक्षेपेक्षाही कमी नसणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेपुर्वीच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधार पदाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचे असे म्हणणे आहे की, जर रोहितने ही मालिका गमावली तर त्याला कर्णधार पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे रोहितसाठी ही कसोटी मालिका महत्वाची आहे.
दुसरी आयसीसी ट्रॉफी गमावणे देशाला परवडणारे नाही. त्यामुळे जर आपण वर्ल्ड कप जिंकली नाही, तर या सर्व द्विपक्षीय विक्रमांचा काही उपयोग होणार नाही, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले. तसेच दोन वर्षांत आम्ही अशा तीन स्पर्धा गमावल्या आहेत. रोहितलाही (Rohit Sharma) हे माहीत आहे आणि संपूर्ण टीमलाही. त्यामुळे ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा सर्वांचा निर्धार असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आम्ही कर्णधारपदातील कोणत्याही बदलाबाबत चर्चा केलेली नाही, परंतु जेव्हा एक WTC चक्र संपते, तेव्हा नवीन सुरू होते. रोहित कसोटी कर्णधारपदी कायम राहणार की नाही ? हे सर्व निकालावर अवलंबून असणार आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. अधिकाऱ्याच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतेय की कर्णधार बदलाचे वारे वाहणार आहेत.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-0 किंवा 3-1 ने जिंकावी लागेल. आणि जर चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने गमावली तर भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडेल. यासोबत रोहितला (Rohit Sharma)कर्णधारपद सोडावे लागण्याची शक्यता आहे.