चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात हा सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी अखेर इंग्लंडच्या पूर्ण संघाला तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंड संघानं रन्सचा डोंगर रचला आहे. 578 धावांवर इंग्लंडचा संघातील सर्व गडी बाद झाले आहेत. तर भारतीय संघासमोर आता धावांचं मोठं आव्हान असणार आहे.
जसप्रीत बुमराहने नववी वेकेट LBW केली तर बाईस 34 धावा करून माघारी परतला. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी तीन गडी बाद करण्यात यश आलं आहे. 186 षटकांनंतर इंग्लंडने 9 गडी गमावत 567 धावा केल्या. लीच 9 आणि जेम्स अँडरसन खेळत होते. मात्र 578 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परता आला.
England are bowled out for 578!
Ashwin gets the final wicket of Anderson to end with three wickets in the innings.
How will India respond with the bat? #INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/mkgBqxkDeQ
— ICC (@ICC) February 7, 2021
जसप्रीत बुमराहने नववी वेकेट LBW केली तर बाईस 34 धावा करून माघारी परतला. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी तीन गडी बाद करण्यात यश आलं आहे. 186 षटकांनंतर इंग्लंडने 9 गडी गमावत 567 धावा केल्या. लीच 9 आणि जेम्स अँडरसन खेळत होते. मात्र 578 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परता आला.
भारतीय संघाला जिंकण्यासाठी आता 579 धावांची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता भारतीय संघ कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी आखून मैदानात खेळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इशांतची हॅट्रिक हुकली
इशांत शर्मा चेन्नई कसोटीच्या दुसर्या दिवशी हॅटट्रिक करण्याची संधी गमावली. त्याने इंग्लंडला सलग 2 चेंडूत दोन झटके दिले. प्रथम त्याने जोस बटलरला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर जोफ्रा ऑर्चरला तंबूमध्ये पाठवले. इशांतने दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लीचने इशांतचा तिसरा चेंडू सहज टोलवला त्यामुळे इशांतची हॅट्रिक हुकली.