चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात हा सामना खेळवला जात आहे. इंग्लंडच्या संघानं सुरुवात सावधपणे केली असली तरी आता त्यांनी कसोटी सामन्यावर आपली पकड आणखीन मजबूत केली आहे. तर भारतीय संघासमोर धावांचा भलामोठा डोंगर पार करण्याचं मोठं आव्हान आहे.
सलग तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघानं खेळावर आपली पकड अधिक घट्ट केली. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात जो रूटने द्विशतकी खेळी करत संघाला 217 धावा मिळवून दिल्या आहे.
चेन्नई कसोटीच्या तिसर्या दिवशी हा खेळ सुरू झाला आहे. दिवसाची पहिली ओव्हर आर अश्विननं पूर्ण केली. त्याला इंग्लंडच्या जॅक लीचचा सामना करावा लागला. या ओव्हरमध्ये इंग्लंड संघाला रन काढता आला आला नाही. इंग्लंड संघानं आतापर्यंतत 181 षटकांनंतर 8 गडी गमावत 556 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ 600 धावा करण्यासाठी सज्ज आहे.
MA Chidambaram Stadium, Chennai.
England are 555/8 going into the third day of the first #INDvENG Test.
What does the day have in store? #INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/htYllfEEVe
— ICC (@ICC) February 7, 2021
इशांत शर्मा चेन्नई कसोटीच्या दुसर्या दिवशी हॅटट्रिक करण्याची संधी गमावली. त्याने इंग्लंडला सलग 2 चेंडूत दोन झटके दिले. प्रथम त्याने जोस बटलरला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर जोफ्रा ऑर्चरला तंबूमध्ये पाठवले. इशांतने दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लीचने इशांतचा तिसरा चेंडू सहज टोलवला त्यामुळे इशांतची हॅट्रिक हुकली.
तर उरलेले इंग्लंड संघाचे दोन गडी बाद करण्यासाठी भारतीय संघातील गोलंदाजांचे प्रयत्न सुरू आहेत. धावांचा भलामोठा डोंगर पार करण्याचं आव्हान आता भारतीय संघासमोर असणार आहे.