मुंबई : इंग्लंडच्या लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमधील सामने खेळवले जात आहेत. दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा 100 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये 1-1ने बरोबरी केली आहे. टीम इंडियाला 247 धावांचं लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या.
विराट कोहलीने दुसऱ्या वन डेमध्ये सुरुवात चांगली केली मात्र मोठी धावसंख्या करण्याची संधी हुकली. कोहली कसोटी प्रमाणे पुन्हा एकदा इथे फ्लॉप ठरल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहली गेल्या दीड वर्षापासून खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. तो केव्हा मोठी धावसंख्या करेल या प्रतिक्षेत अनेक चाहते आहेत.
दुसऱ्या वन डेमध्ये विराटचा पुन्हा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यानंतर अनेक दिग्गजांनी त्याला टीममधून बाहेर बसवण्याची मागणीही केली आहे. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा विराट कोहलीच्या बाजूने त्याचा बचाव करण्यासाठी धावून आला.
रोहितने विराटच्या खराब फॉर्मबद्दल पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं. याची चर्चा कशासाठी होते तेच मला समजत नाही. कोहलीने किती सामने खेळले आहेत. तो एवढे वर्ष खेळत आहे. त्याचा अनुभव त्याची फलंदाजी आपण सगळ्यांनी पाहिली आहे.
विराट कोहलीला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही. फॉर्ममध्ये खेळणं किंवा फ्लॉप होणं हे दोन्ही क्रिकेटच्या करिअरचा एक भाग आहेत. त्यामुळे इतकी वर्षे खेळणाऱ्या, इतक्या धावा केल्या अनेक सामनेही जिंकवले. आता कोहलीला बुस्ट करण्यासाठी एक किंवा दोन चांगल्या डावात खेळण्याची गरज आहे.
खेळाडूंची कामगिरी प्रत्येकवेळी चांगली राहू शकत नाही. कधी चांगली तर कधी वाईट असू शकते याबाबत आम्हालाही माहिती आहे असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. अजूनतरी कोहलीला बाहेर बसवण्याचा विचार नसल्याचं मॅनेजमेंट किंवा रोहितच्या एकूण बोलण्यातून स्पष्ट झालं आहे.