पर्थ :ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप (T20 world Cup) सामन्यात आज टीम इंडियाने (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) 4 विकेट राखून पराभव केला. हा विजय मिळवत टीम इंडियाने 2021 च्या वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा बदलाच घेतलाय. टीम इंडियाच्या या विजयाने देशवासियांची दिवाळी आणखीणच गोड झाली आहे. तसेच मेलबर्नच्या या मैदानात राजकिय बॅनरबाजीही पाहायला मिळाली. या बॅनरबाजीचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
भारत पाकिस्तान (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामन्यात राजकिय बॅनरबाजी देखील पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा समर्थक शिंदे गटाच बॅनर घेऊन मैदानात पोहाचला होता. या शिंदे समर्थकाने मेलबर्नच्या मैदानात शिंदे गटाचे (Shinde Group) बॅनरही झळकावले होते. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. तर बॅनरमध्ये वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे असा मजकूरही लिहण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे या बॅनरवर अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिंदे गटाला (Shinde Group) देण्यात आलेल ढाल-तलवार हे चिन्ह देखील होतं.
ठाण्यातील दिवा भागात राहणारा एक शिंदे समर्थक (Shinde Group) मेलबर्नमध्ये भारत पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पाहायला पोहोचला होता. या शिंदे समर्थकाने सामन्या दरम्यान मैदानात शिंदे गटाचे बॅनर झळकावले होते. हे बॅनर झळकावतानाचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
कॉग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने देखील पोस्टर्स झळकावले होते. हा पोस्टर भारत जोडो यात्राचा (Bharat Joda Yatra) होता. या पोस्टरवर राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि इतर कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते. हे पोस्टर सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानने (Pakistan) प्रथम बॅटींग करत 8 विकेट गमावून 159 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे विजयासाठी टीम इंडियासमोर (Team India) 160 धावांचं आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. एका मागो माग एक विकेट पडत गेले. विराटने मात्र एकाकी झूंज दिली. विराट कोहलीने नाबाब 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. विराटच्या या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानवर 4 गडी राखून विजय मिळवला.
दरम्यान टीम इंडियाच्या (Team India) या विजयाने देशवासियांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. या विजयानंतर आता टीम इंडियाच्या पुढच्या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.