मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2nd Test) खेळत आहे. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे. (ind vs sl 2nd test day 2 rishabh pant hit fastest half century off 28 balls for team india and surpassed to kapil dev dhoni and shardul at m chinnaswamy stadiums bangalore)
पंतने 42 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार ठोकत ऐतिहासिक अर्धशतक (Rishabh Pant Fastest Fifty) पूर्ण केलं. पंत टीम इंडियाकडून (Team India) कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. पंतने अवघ्या 28 चेंडूत हा कारनामा केला आहे. अर्धशतकासह त्याने झटक्यात 3 दिग्ग्ज खेळाडूंना पछाडलं आहे.
या वेगवान अर्धशतकासह पंतने टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) आणि महेंद्रसिंह धोनी (Mahedra Singh Dhoni) या दोघांना मागे टाकलंच. सोबतच शार्दुल ठाकूरलाही (Shardul Thakur) त्याने पछाडलं.
कपिल देव यांनी आजपासून 40 वर्षांआधी 30 चेंडूत हे अर्धशतक लगावलं होतं. तर शार्दुलने 31 बॉलमध्ये शानदार अर्धशतक ठोकलं होतं.
देव यांनी ही कामगिरी पाकिस्तान तर ठाकूरने इंग्लंड विरुद्ध हे अर्धशतक ठोकलं होतं.
मात्र अर्धशतकी खेळीनंतर रिषभ पंत आऊट झाला. पंतने 31 चेंडूत 50 धावांच्या खेळीत 7 फोर आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. दरम्यान टीम इंडियाने लंच ब्रेकपर्यंत 47.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. पहिल्या डावातील 143 धावांच्या आघाडीमुळे आता टीम इंडियाने एकूण 342 रन्सची लीड मिळवली आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.
FIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
Take a bow, Rishabh
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2H
— BCCI (@BCCI) March 13, 2022