मुंबई : इंडियाच्या 'ए' टीमने उत्कृष्ट प्रदर्शन करत वेस्टइंडिज 'ए' च्या विरोधात वनडे सीरीजमध्ये ४-१ ने विजय मिळवला. सीरीजच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्याच्या मॅचमध्ये इंडिया 'ए' ने आठ विकेटने विजय मिळवत सिरीजही जिंकली. वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये निवडलेल्या नवदीप सैनी (Navdeep Saini),दीपक चहर (Deepak Chahar) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांनी दोन-दोन विकेट घेतले.
सेंट जॉन्समध्ये खेळला गेलेला सामना एक तर्फी झाला. इंडिया 'ए' टीमने १७ ओव्हर बाकी ठेवत विजय मिळवला. टीममध्ये रितुराज गायकवाड याने सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली. शुभमन गिलने ६९ धावा केल्या. आधी फलंदाजी करतांना वेस्टइंडिज 'ए' ने २३६ धावा केल्या.
रितुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्यात पहिली विकेटसाठी मोठी भागीदारी झाली. त्यामुळे इंडिया 'ए' टीमने सहज विजय मिळवला.
सामन्यात आधी फलंदाजी करताना वेस्टइंडिज 'ए' साठी सुनील अंबरीस आणि जोर्न ओटल यांनी ७७ धावा केल्या. युवा फास्ट बॉलर नवदीप सैनीने ओटलला आउट करत भागिदारी मोडली.
वेस्टइंडिज ए टीमने १२४ धावावर ७ विकेट गमवले. शेन रूदरफोर्डने डाव सावरत ६५ धावा करून वेस्टइंडिज 'ए' ला २०० धावांपर्यंत पोहोचवले. वेस्टइंडिज 'ए' टीम २३६ धावांवर ऑलआऊट झाली. इंडिया 'ए' टिमसाठी नवदीप सैनी, राहूल चहर आणि दिपक चहर यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.
वेस्टइंडिज 'ए' कडून मिळालेल्या लक्ष्य गाठवण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंडिया 'ए'च्या रितूराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी ११.३ ओव्हरमध्ये ११० धावा केल्या. गिलला ६९ धावांवर किमो पॉलने आऊट केले. श्रेयस अय्यरने गायकवाड सोबत ११२ धावांची भागीदारी केली.
रितूराजला शतक पूर्ण करत आले नाही. तो ९९ धावांवर आऊट झाला. कर्णधार अय्यरने ६१ तर मनीष पांडेने ७ धावा केला.