मुंबई : अंडर १० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला लोळवल्यानंतर फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता त्यात १०० धावांनी भारताने विजय मिळविला होता.
यावेळी फायनल सामना कोणीही जिंकला तरी विश्व कप हा भारतीय खेळाडूच उचलणार आहे. यातील इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार जेसन सांघा हा मूळचा भारतीय आहे. जेसनचे वडील पंजाबचे राहणारे आहेत. ते पंजाबमध्ये राज्यस्तरीय एथलिट होते. सांघाशिवाय मूळचा भारतीय असलेल्या परम उप्पल यालाही ऑस्ट्रेलिय संघात स्थान देण्यात आले आहे. परम उप्पलचा जन्म पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंडीगढ येथे झाला आहे.
हे देखील वाचा : जिंकणारच... मैदानात उतरण्यापूर्वीच कोहलीला माहीत होतं
सांघा याने प्रथम श्रेणीचे दोन सामने खेळले आहेत. त्यात त्याने १४१ धावा काढल्या आहेत. त्याने लिस्ट एचे पण दोन सामने खेळले आहेत. तसेच उप्पल याने लिस्ट एचे ६ सामने खेळले आहेत.
टीम इंडियाने सहा वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यात 2002, 2006, 2008, 2012 आणि 2016 फायनल गाठली होती.. यातील तीन वेळा भारताने खिताब पटकावला होता. अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलियाने ३-३ वेळा कप जिंकला आहे. ऑस्ट्रलियाने 1988, 2002 आणि 2010 भारताने 2000, 2008 आणि 2012 खिताब आपल्या नावावर केला होता. टीम इंडियाला २००६ आणि २०१६ ला फायनलमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
हे देखील वाचा : आता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट
विशेष म्हणजे अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ भारतानेच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये अंडर १९ च्या वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघाचा सामना झाला होता. त्यावेळी भारताने कांगारूंना ६ विकेटने पराभूत केले होते. ही अशी पहिली वेळ होती की ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये कोणीतरी पराभूत केले होते.