अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना डे-नाइट खेळवला जाणार आहे. या तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकली आहे. इंग्लंड संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी टीम इंडियाला दिली. टीम इंडियामध्ये दोन बदल झाले आहेत. मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालं आहे.
3rd Test. India XI: R Sharma, S Gill, C Pujara, V Kohli, A Rahane, R Pant, W Sundar, R Ashwin, A Patel, J Bumrah, I Sharma https://t.co/9HjQB6CoHp #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2021
3rd Test. England XI: D Sibley, Z Crawley, J Bairstow, J Root, B Stokes, O Pope, B Foakes, J Archer, J Leach, S Broad, J Anderson https://t.co/9HjQB6CoHp #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2021
भारतः रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड: डोमिनिक सिब्ली, जॅक क्रोली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅण्डरसन.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना डे नाईट स्वरूपात खेळला जाईल. 4 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर दुसऱ्या सामन्यात मात करत भारतीय संघानं 1-1 अशी बरोबरी केली आहे. मोटेरा स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं असून नरेंद्र मोदी स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं आहे.