लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी हिटमॅन रोहित शर्मा धमाकेदार बॅटिंग करतोय. रोहितने खणखणीत सिक्स लगावत शानदार शतक पूर्ण केलंय. रोहितने हे शतक 204 चेंडूत 12 फोर आणि 1 सिक्ससह हे शतक पूर्ण केलं. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे एकूण 8 वं शतक ठरलं. तर परदेशातील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. (india vs england 4th test day 3 Rohit Sharma complete his century with six)
मोईन अली टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 64 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर रोहितने क्रीझच्या बाहेर येत जोरदार सिक्स खेचला. यासह त्याने शतक पूर्ण केलं. रोहितच्या या शानदार खेळीसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी उभं राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
First century outside India for the Hitman!
He gets there with a monster six over long on!Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! #ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #RohitSharma pic.twitter.com/4HDSE276Ow
— Sony Sports (@SonySportsIndia) September 4, 2021
सिक्स ठोकून शतक पूर्ण करणारे भारतीय
टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 6 वेळा सिक्स ठोकून शतक पूर्ण केलंय. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने असा कारनामा करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.
सचिन तेंडुलकर- 6
रोहित शर्मा- 3
गौतम गंभीर- 2
रिषभ पंत- 2