वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. ५ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने आधीच ३-०ने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या तिन्ही मॅच जिंकून भारताने सीरिज खिशात टाकली आहे. त्यामुळे चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारतीय टीम दुसऱ्या खेळाडूंना संधी द्यायची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचनंतरच कर्णधार विराट कोहलीने चौथ्या टी-२०मध्ये वेगळ्या खेळाडूंची निवड होईल, असे संकेत दिले होते. नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे खेळाडू बाहेर बसले आहेत. या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, असं विराट कोहली म्हणाला होता.
पहिल्या तिन्ही टी-२० मॅचमध्ये भारताने एकच टीम उतरवली होती. या सीरिजमध्ये सुंदर आणि सैनी यांच्याबरोबरच ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांनाही खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे विराट आता यांच्यापैकी कोणाला खेळवणार आणि टीममधल्या कोणत्या खेळाडूंना विश्रांती देणार हा प्रश्न आहे.
भारतीय टीम
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह