नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
पाकिस्तानची महिला टीम भारतीय टीमच्या अनुभवाच्या बाबतीत खूपच मागे आहे. भारतीय महिला टीमचा हा नववा वर्ल्डकप आहे तर पाकिस्तानच्या माहिला
टीमचा हा चौथा वर्ल्डकप आहे.
भारतीय टीम 2005ची उपविजेता
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, भारताने 1978 मध्ये प्रवेश केला होता. 2013 ला सोडलं तर भारतीय संघाने प्रत्येक वर्षी सेमिफायनलमध्ये धडक दिली आहे. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. पाकिस्तान मात्र शेवटच्या चार संघामध्ये देखील जागा नाही मिळवू शकला. 2009 मध्ये पाकिस्तान सहाव्या स्थानावर होता.