मुंबई : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. दोन्ही संघ 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहेत. 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत सिडनी आणि कॅनबेरा येथे एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळल्या जातील. त्याचबरोबर कसोटी मालिकेचा पहिला सामना अॅडलेडमध्ये 17 डिसेंबरपासून होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जोरदार सराव करीत आहे. सर्व खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. बीसीसीआयने सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत टीम इंडिया न्यू जर्सीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी असा अंदाज वर्तविला जात होता की या मालिकेत घातलेली जर्सी 1992 विश्वचषकात परिधान केलेल्या जर्सीसारखीच असेल.
New jersey, renewed motivation. Ready to go.pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या ट्विटर हँडलवर टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'न्यू जर्सी, नवी प्रेरणा. जाण्यासाठी सज्ज'.
1992 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाने जी जर्सी परिधान केली होती. ती गडद निळ्या रंगाची जर्सी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घालणार आहे.
भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा
वनडे मालिका
27 नोव्हेंबर - पहिली वनडे, सिडनी
29 नोव्हेंबर - दुसरी वनडे, सिडनी
1 डिसेंबर - तिसरी वनडे, ओव्हल
टी-20 मालिका
4 डिसेंबर - पहिला सामना, ओव्हल
6 डिसेंबर - दुसरा सामना, सिडनी
8 डिसेंबर - तिसरा सामना, सिडनी
कसोटी मालिका
17-21 डिसेंबर - पहिला सामना, अॅडलेड
26-31 डिसेंबर - दुसरा सामना, मेलबर्न
7-11 जानेवारी - तिसरा सामना, सिडनी
15-19 जानेवारी - चौथा सामना, ब्रिस्बेन