MotoGP Bharat 2023: ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सक्रिटवर MotoGP 2023 ची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील बायकर्स सहभागी झालेत. मोटररेस सुरु होण्याच्या आदल्या दिवशी सर्व बायकर्सने बुद्ध इंटरनॅशनल सक्रिट ट्रॅकवर जोरदार सराव केला. पण सरावादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. जपानी बायकर ताइयो फुरुसातो (Taiyo Furusato) याची बाईक ट्रॅकवर घसरली आणि बाईकला अचानक आगल लागली. सुदैवाने फुरुसातो अपघातून थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार जपानी बायक ताइयो फुरुसातो बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर सराव करत होता. बाईक वेगात पळवत असताना एका टर्नवर त्याचं बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि बाईक रस्तावर पलटली गेली. बाईकबरोबर फुरसातोही काही अंतरापर्यंत फरफटत गेला. त्याचवेळी अचानक बाईक आग लागली आणि बघता बघता संपूर्ण बाईकने पेट घेतला. सुदैवाने फुरुसातो तात्काळ बाजूला झाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. दुर्घटनेनंतर सुरक्षा रक्षक आणि ग्राऊंड स्टाफ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाईकला लागलेली आग नियंत्रणात आणली.
इंडियन ग्रांपीतला पहिला अपघात
भारतात होणाऱ्या इंडियन ग्रांप्रीत जगभरातील मोटार सायकलिस्ट सहभागी झाले आहेत. यात जपाननेही सहभाग घेतला आहे. जपानचा बायकर ताइयो फुरुसातो हा होंडा टीमचं प्रतिनिधित्व करतोय. फुरुसातोचा अपघात ही यंदाच्या इंडियन ग्रांप्रीमधली पहिली मोठी दुर्घटना ठरली आहे.
That's a big setback for the rider 2nd in the Championship! @AyumuSasaki1 crashes and his bike has gone up in flames! #IndianGP pic.twitter.com/m334a63r6J
— MotoGP (@MotoGP) September 23, 2023
सदगुरुंनीही चालवली बाईक
बुद्ध इंटरनॅशनल सक्रिटवर शुक्रवारी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि योगी जग्गी वासुदेव सदगुरी यांच्या हस्ते इंडियन ऑईल ग्रँड प्रिक्स ऑफ इंडिया (indian oil grand prix of india) स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी सदगुरु यांनी स्वत: मोटरसायकल चालवण्याचा आनंद लुटला. सुदगुरु यांनी दुचाकीवरुन अनेकवेळा मोठ्या यात्रा केल्याचं सांगितलं. त्यावेळी आपल्याकडे आतासारखी सुपरबाईक नव्हती तर 250 सीसी सिंगल सिलेंडरची दुचाकी होती अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
असं आहे वेळापत्रक
इंडियन ऑईल ग्रँड प्रिक्स ऑफ इंडिया ही स्पर्धा 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर खेळवली जात आहे. या स्पर्धेचं जीओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जात आहे.