नवी दिल्ली : पंजाबमधील मोहालीचा राहणारा सिमरनजीत सिंग आयर्लंड संघाकडून बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहे. याच वर्षी मे महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. सिमरनजितच्या आधी, गुरिंदर संधू आणि इश सोढी या क्रिकेटपटूंनी दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यास सुरु केली होतं.
वेस्टइंडीजविरुद्ध 13 सप्टेंबर रोजी एकदिवसीय सामन्यांसाठी तो आयर्लंड संघाचा भाग असणार आहे. 22 जून रोजी यावर्षी, आयर्लंडला टेस्ट सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय संघाचा दर्जा मिळाला आहे.
सिमरनजित सिंगचं स्वप्न भारतासाठी खेळायचा होतं पण त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याला कसोटी क्रिकेट आवडतो आणि आता तो टेस्टमध्ये पदार्पण करण्यास तयार झाला आहे.
सात वर्षांपर्यंत, सिमने पंजाबच्या ज्युनियर संघांसाठी भरपूर धावा केल्या आणि विकेट्स मिळवल्या. पण त्याला अंडर 19 मध्ये जागा नाही मिळाली. 2004 मध्ये त्यांनी राज्यस्तरीय जिल्हा अंडर -17 स्पर्धेत 725 धावा केल्या होत्या.
2001 मध्ये विजयवाडा येथे झालेल्या 46 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीनेही त्याला अंडर 19 संघात जागा न मिळाल्याने तो उदास झाला होता.