टाँटन : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला विजयासाठी १८४ धावा हव्यात. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १८३ धावा केल्या.
भारताने नाणेफेक जिंकताना प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्य़ा प्रभावी माऱ्यासमोर वेस्ट इंडिजला ५० षटकांत १८३ धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून सलामीवीर हेले मॅथ्यूजने ४३ धावा केल्या. त्यानंतर शॅनेल डेलीने ३३ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारताकडून हरमनप्रीत कौर, पूनम यादव, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडले.