मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे आयपीएलचं पहिल्या २ आठवड्यांचंच वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतर या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. या पुढचं वेळापत्रक निवडणुकींच्या तारखांवर अवलंबून असेल. यंदाच्या मोसमामध्ये अनेक टीमनी काही जुन्या खेळाडूंना सोडून दिलं आहे, तर दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
भारताचा दिग्गज बॅट्समन आणि सिक्सर किंग म्हणून ओळख असलेला युवराज सिंग यावेळी मुंबईच्या टीमकडून खेळताना दिसेल. आयपीएलच्या लिलावामध्ये मुंबईनं युवराज सिंगला १ कोटी रुपयांना विकत घेतलं. मागच्या वर्षी युवराज पंजाबच्या टीमकडून खेळला होता. आयपीएलच्या सुरुवातीच्या लिलावामध्ये युवराज सिंगवर कोणत्याच टीमनं बोली लावली नाही. अखेर दुसऱ्या फेरीमध्ये मुंबईनं युवराजला विकत घेतलं.
यंदाच्या वर्षी मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगनं रोहित शर्माला ट्विटरवरून एक प्रश्न विचारला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्मा माझ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? असं ट्विट युवराजनं केलं. युवराजच्या या प्रश्नाला रोहित शर्मानंही उत्तर दिलं. तू फक्त तुझा उत्साह आणि उर्जा घेऊन ये. बाकीचं सगळं ड्रेसिंग रूम बघेल, असा रिप्लाय रोहित शर्मानं दिला.
Looking forward to joining Hitman @Imro45 in the Mumbai Indians dressing room this season. Any hints on what to expect ?
— yuvraj singh (@YUVSTRONG12) February 20, 2019
Just bring your usual passion. The dressing room will sort out the rest. @NetflixIndia, have any tips?
— Rohit Sharma (@ImRo45) February 20, 2019
मागच्या मोसमामध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या मुंबईच्या टीमला यावर्षी त्यांचा खेळ सुधारण्याचं आव्हान असेल. यंदाच्या वर्षी मुंबई त्यांचा पहिला सामना २४ मार्चला खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध ही मॅच होईल
२४ मार्च- मुंबई विरुद्ध दिल्ली- वानखेडे स्टेडियम
२८ मार्च- बंगळुरू विरुद्ध मुंबई- चिन्नास्वामी स्टेडियम
३० मार्च- पंजाब विरुद्ध मुंबई- मोहाली स्टेडियम
३ एप्रिल- मुंबई विरुद्ध चेन्नई- वानखेडे स्टेडियम
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंह, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जासवाल, राशिख सलाम