यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 14) थरारक झालेल्या 38 व्या सामन्यात (IPL 2021 Match 38Th Result) चेन्नईने (CSK) कोलकातावर (KKR) 2 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग तिसरा विजय साजरा केला. तसेच पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (ipl 2021 chennai vs kolkata captain mahendra singh dhoni overtake to dinesh karthik and become 1st wicketkeepar who take most catches in ipl history)
धोनी आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. धोनीने विकेटकीपर म्हणून हा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे कोलकाताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) कॅच पकडत हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
काय आहे रेकॉर्ड?
धोनीने आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक कॅच पकडण्याचा (most catches in ipl as wicket keeper) विक्रम केला आहे. धोनीने या सामन्यात स्टंपमागे वेंकटेश अय्यर आणि दिनेश कार्तिकला कॅच आऊट केलं. यासह धोनीने कार्तिकला मागे टाकलं. धोनीच्या नावे आयपीएलमध्ये कीपर म्हणून एकूण 116 कॅचेसची नोंद आहे. तर दिनेश कार्तिकने आतापर्यंत 115 फलंदाजांना झेलबाद केलंय.
धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 155 जणांना स्टंपमागे आऊट केलंय. यामध्ये 116 कॅचचा समावेश आहे. तर 39 स्टंपिंग्स आहेत. धोनीने 214 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
तर दिनेश कार्तिकने 206 मॅचेसमध्ये 146 जणांना आऊट केलंय. यात 115 कॅच आणि 31 स्टंपिंग्सचा समावेश आहे. धोनी आणि कार्तिक व्यतिरिक्त आयपीएलमध्ये आतापर्यंत स्टंपमागे कोणत्याही विकेटकीपरला 100 पेक्षा अधिक फलंदाजांना बाद करता आलेलं नाही.