मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थान या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या. (ipl 2022 mi vs rr rajsthan royals beat mumbai indians by 23 runs at d y patil stadium)
मुंबईकडून तिलक वर्मा (Tilak Varma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तिलकने 61 तर इशानने 54 धावांची खेळी केली. या दोघांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली.
या दोघांव्यतिरिक्त कायरन पोलार्डने अखेरपर्यंत मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर उशीर झाला होता. पोलार्ड सामन्याच्या शेवटच्या चेंडवर 22 धावांवर कॅच आऊट झाला.
दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग केली. दिल्लीकडून नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने 68 चेंडूत 11 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतकी खेळी केली. शतक ठोकल्यानंतर जॉस आऊट झाला.
शिमरॉन हेटमायरने 14 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 35 धावांची वादळी खेळी केली. तर कॅप्टन संजू सॅमसनने 30 धावांचं योगदान दिलं. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल.