मुंबई : सध्या टीम इंडियाचं लक्ष्य T20 वर्ल्ड कपकडे आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं कर्णधार रोहित शर्माची तयारी सुरू आहे. आयपीएलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. याचं कारण त्यावरही पुढच्या काही गोष्टी निर्भर असू शकतात.
गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. आता यावेळी पूर्ण तयारीने कर्णधार रोहित शर्माची टीम मैदानात उतरणार आहे. त्यासाठी टीम आणि मॅनेजमेंटची आतापासून तयारी आहे.
टीम इंडियातील बुमराहचं स्थान पक्क
वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात शमीला विश्रांती देण्यात आली होती. शमीला टी 20 वर्ल्ड कपनंतर 5 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. प्रत्येक बॉलर तिन्ही फॉरमॅट खेळू शकत नाही. पण जसप्रीत बुमराह असा गोलंदाज आहे ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपलं स्थान पक्क केलं अशी माहिती BCCI च्या सूत्रांनी दिली.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शमीसह इतर गोलंदाजांना ही गोष्ट आधीच सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता मोहम्मद शमीलाही बीसीसीआयकडून थेट काही गोष्टी सांगण्यात येऊ शकतात.
शमीने आपल्या करिअरमध्ये 17 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टी 20 पेक्षा शमीची कामगिरी वन डेमध्ये उत्तम आहे. त्याने 79 वन डे सामने खेळून 148 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र शमीच्या खराब फिल्डिंगचा तोटा टीम इंडियाला होत आहे. त्याच्या फिल्डिंगवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला कोणतीही जोखीम उचलायची नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीवरही मॅनेजमेंटचं बारीक लक्ष असणार आहे. आयपीएलमध्ये जर शमीनं चांगली कामगिरी केली तर त्याला टी 20 वर्ल्ड कपसाठीचे दरवाजे खुले होतील. जर आयपीएलमध्ये तो उत्तम कामगिरी करू शकला नाही तर टी 20 वर्ल्ड कपसाठीचे दरवाजे बंद होतील.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडूंवर भर
बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आवेश खान एवढी खेळाडू आहेत जे टी 20 मध्ये उत्तम कामगिरी करतात. शार्दूर आणि दीपक चाहर ऑलराउंडर आहेत. शमी फलंदाजी करत नसल्याने त्याला कधी संधी मिळेल याकडे पाहावं लागणार आहे. आयपीएलमध्ये जर शमीनी चांगली कामगिरी केली नाही तर त्याची टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड होण्याची वाट बिकट असल्याचं निश्चित आहे.
मोहम्मद शमी गुजरात संघाकडून खेळणार आहे. 6.25 कोटी रुपये देऊन गुजरात संघात सहभागी केलं आहे. गेल्या हंगामात शमी पंजाबकडून खेळला होता. त्याने 14 सामन्यात फक्त 19 विकेट्स घेतल्या होत्या.