IPL 2023 Qualifier 2 : मुंबईच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चांगली सुरुवात मिळाली नसली तरीही शेवटच्या टप्प्यात मात्र अंबानींच्या मालकीच्या या संघानं गुणतालिकेत चांगलीच मुसंडी मारली. पाहता पाहता संघ IPL 2023 Qualifier 2 पर्यंत पोहोचला आणि विजयापासून अवघा दोन पावलं दूर अंतरावर येऊन उभा ठाकला. इथे संघाला हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स या संघाचं आव्हान होतं. गुजरातनं दणक्यात सुरुवात करत शुक्रवारी पार पडलेल्या या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव केला. आधी मुंबईच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणत आणि नंतर फलंदाजांना गोंधळवत गुजरातनं हा IPL 2023 Qualifier 2 सामन गाजवला.
संपूर्ण सामन्यामध्ये काही खेळाडू विशेष गाजले. त्यातलंच एक नाव म्हणजे शुभमन गिल. गुजरातच्या शुभमनने या सामन्यात अफलातून खेळीचं प्रदर्शन करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. मुख्य म्हणजे त्याचे मास्टरस्ट्रोक पाहून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारावला. इतका, की सामन्यानंतर त्यानं शुभमनशी संवादही साधला. याच क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फक्त फोटो व्हायरल होत नाहीत, तर या फोटोंवर नेटकरी त्यांची कल्पनाशक्ती लढवत काही कमेंट्सही करताना दिसत आहेत. आता त्या कमेंट्स नेमक्या कोणत्या धर्तीवर आहेत हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. (ipl 2023 gujrat titans Shubman Gill chats with Mi Mentor Sachin Tendulkar post GT Vs MI Qualifier 2 Photo Viral )
Shubman Gill with Sachin Tendulkar. pic.twitter.com/Tk5Y2aImE4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
Gill: Suno sasurji ab zidd chhoro maan lo meri baat, Sara to jaygi Shubman Gill ke saath!
— bhaskar.02_ (@brtoshniwal09) May 26, 2023
Save this image. And frame it. For all the wrong reasons.
— Shahzeb Khan (@theshahzebkhan) May 26, 2023
— Naveen (@_naveenish) May 26, 2023
तिथं शुभमन आणि सचिनचा फोटो अनेक कारणांनी चर्चेत आलेला असतानाच इथे त्याच्या खेळाचीही अनेकांनीच प्रशंसा केली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं सलग दुसऱ्यांना शतकी खेळी केली होती. या खेळीसोबतच तो 851 धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याच्यामागोमाग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार Faf du Plessis याचं नाव येत असून, त्यानं 730 धावा केल्या आहेत.
सध्या गिलचा एकंदर फॉर्म पाहता अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा क्रिकेटप्रेमी ठेवत आहेत. इतकंच नव्हे, तर गिल सध्या विराट कोहली आणि जोस बटलरच्या शतकांच्या विक्रमापासूनही काहीच पावलं दूर आहे. तेव्हा आता क्रिकेटप्रेमीच्या अपेक्षा तो पूर्ण करेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.