IPL 2023 : स्टीव्ह स्मिथ थेट ऑस्ट्रेलियातून करतोय IPL ची कॉमेंट्री; अफलातून Technology पाहून तुम्हीही व्हाल थक्क

IP 2023 News : आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाची हवीहवीशी वाटणारी मेजवानी. क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला नेणाख्या या महापर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच एका नव्या तंत्रज्ञानानं सर्वांनाच थक्कही केलं आहे.   

सायली पाटील | Updated: Apr 3, 2023, 10:31 AM IST
IPL 2023 : स्टीव्ह स्मिथ थेट ऑस्ट्रेलियातून करतोय IPL ची कॉमेंट्री; अफलातून Technology पाहून तुम्हीही व्हाल थक्क  title=
IP 2023 Steve Smith Joins on Commentary Panel Through Hologram Technology from Australia Fans Amazed

IPL 2023 News : आयपीएलमध्ये (IPL Scedule) दरवर्षी काही ना काही नव्या गोष्टी पहायला मिळतातच. यंदाचं पर्वही त्याला अपवाद ठरलेलं नाही. यावर्षी तर, क्रिकेटप्रेमी एक चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. तंत्रज्ञान नेमकं किती पुढे गेलं आहे याचीच प्रचीती या IPL च्या निमित्तानं सर्वांनाच झाली. निमित्त ठरतोय तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा (Australia) खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि त्याचं प्रभावी समालोचन अर्थात कॉमेंट्री. 

यंदा स्मिथला कोणत्याही संघानं निवडलं नसलं तरीही तो commentator म्हणून आयपीएलशी जोडला गेला आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आहे. असं असलं तरीही तो इथं भारतात स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्येही आहे. हे कसं शक्य आहे? काहीही काय, एकाच वेळी तो दोन्ही ठिकाणी कसा असू शकतो? हे असेच प्रश्न तुम्हालाही पडत आहेत ना? 

तंत्रज्ञान आणि बरंच काही... 

पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना? आयपीएलच्या पहिल्याच दिवशी स्टीव्ह इतर commentators सोबत दिसला तो म्हणजे होलोग्राम तंत्रज्ञानामुळं. या नव्या भूमिकेत दिसण्यापूर्वीच स्मिथनं आपण यंदाच्या वर्षी एका नव्या भूमिकेत आयपीएलमध्ये झळकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. IPL च्या पहिल्या सामन्याच्या वेळी स्मिथसोबत टॉम मूडी, एरॉन फिंच हे खेळाडूसुद्धा झळकले. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 25 वर्षी ऑलराऊंडरचीच चर्चा 

 

सिडनीमध्ये स्वत:च्या घरी असतानाही स्मिथ ज्या प्रकारे भारतात सुरु असणाऱ्या आयपीएल सामन्यांचं विश्लेषण करताना दिसत आहे हे सर्वकाही तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळं शक्य झालं आहे. यावर व्यक्त होत विज्ञान आणि तंत्रज्ञान जगतातील ही एक नवी पहाटच आहे असं म्हणत नेटकरी या प्रसंगी व्यक्त झाले. 

स्मिथची नेमकी भूमिका काय? 

यंदाच्या वर्षी कोणत्याही संघातून नव्हे, तर स्मिथ Expert Pannel च्या माधघ्यमातून  क्रिकेटप्रेमींच्या भेटीला आला आहे. कॉमेंट्री क्षेत्रातील ही त्याची इनिंग क्रिडाप्रेमींच्या मनाचा ठाव घेते का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून स्मिथ IPL पासून दूर होता. तर, यंदाच्या वर्षी त्याच्यावर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. क्रिकेट कारकिर्दीविषयी सांगावं तर, त्यानं सिडनी सिक्सर्स या संघाच्या वतीनं बिग बॅश लीगमध्ये कमाल खेळीचं प्रदर्शन केलं होतं. ज्यानंतर त्याच्यावर आयपीएलमध्ये तगडी बोली लागेल अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण, इथंही निराशाच पदरी पडली. दिल्ली आणि राजस्थान या संघांसाठी स्मिथ आतापर्यंत खेळला असून, राजस्थानच्या संघाचं कर्णधारपदही त्यानं भूषवलं होतं. आता मात्र तो वेगळीच इनिंग जगत आहे, हे मात्र खरं.