Virat Kohli Meet Rinku Singh : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात आयपीएल 2024 ची 10 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने दणक्यात विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) या दोघांची भेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये झाल्याचं दिसून आलं. भेटीदरम्यान विराटने रिंकूसाठी एक खास गिफ्ट देखील दिलं. याबद्दलची पोस्ट केकेआरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट 'एक्स' वर सुद्धा टाकली आहे. पराभवानंतर विराटने असं काय गिफ्ट दिलंय? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
रिंकू सिंगला भेटल्यावर विराट कोहलीने गुरूधर्माच्या नात्याने रिंकूला बॅटच्या रूपात गुरूदक्षिणा दिली. यानंतर रिंकू सिंगने त्या दोघांचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून विराटचे आभारसुद्धा मानले. विराटने केकेआरविरूद्ध झालेल्या या सामन्यात अतूलनीय कामगिरी करत, 59 बॉलमध्ये 4 चौके आणि 4 षटकार लगावत 83 रन्स बनवले होते आणि कोलकत्याला 20 ओव्हरमध्ये 183 धावांचे आव्हान दिलं होतं. पण केकेआरने हे लक्ष्य खूप सोप्या पद्धतीने 16.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं, ज्यामध्ये रिंकू सिंग हा 5 बॉलमध्ये 5 धावा बनवून नाबाद राहिला होता.
विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये
विराट कोहली हा आयपीएल 2024 मध्ये अगदी वेगळ्या अंदाजात फलंदाजीचे प्रदर्शन करतोय, विराटने या सिझनमध्ये 3 मॅचेसमध्ये 90.50 च्या सरासरीने 181 धावा बनवल्या आहेत. त्याच्या डोक्यावर सध्या ऑरेंज कॅप पण विराजमान आहे. विराटने नुकताच केकेआरविरूद्ध 83 धावांची धुवांधार खेळी खेळली यानंतर पंजाब आणि चेन्नईविरूद्ध त्याने क्रमशः 77 आणि 21 धावा केल्या आहेत.
आरसीबी पॉईंट्स टेबलवर सहावी
आयपीएल 2024 च्या पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई सूपर किंग्स ही 2 पैकी 2 मॅच जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे आणि लखनऊ सूपर किंग्स ही शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता आरसीबीची गाडा पुढे कधी सरकणार? असा प्रश्न विचारला जात आहे.