Ashwin Returns To MS Dhoni CSK: टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाजी रविचंद्रन अश्विनने (Ravichandra Ashwin) आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबर आयपीएलमध्येही (IPL) दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामतही आर अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी (RR) महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विन आयपीएलमध्ये पाच संघांसाठी खेळला आहे. 2008 ते 2015 दरम्यान अश्विन चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) खेळला. त्यानंतर वेगवेगळ्या संघांमधून अश्विन खेळलाय. आता या दिग्गज स्टार फिरकी गोलंदाजाची पुन्हा एका चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री झाली आहे.
राजस्थान रॉयल्सचा सदस्य
आर अश्विन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करतो. राजस्थानने अद्याप अश्विनला रिलीज केलेलं नाही. या दरम्यान अश्विनला चेन्नई सुपर किंग्सकडून मोठी ऑफर मिळाली आहे. जुन्या टीमने दिलेली ऑफर अश्विन धुडकावू शकला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा चेन्नईशी नातं जोडलं आहे. चेन्नईची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सने अश्विनकडे मोठी जबाबादारी सोपावली आहे.
अश्विनकडे मोठी जबाबदारी
आर अश्विनला चेन्नई सुपर किंग्समध्ये हाय परफॉर्मेन्स सेंटर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएल 2025 च्या हंगामापूर्वी हे सेंटर सुरु करण्यात येणार आहे. यात अश्विनची महत्त्वाची भूमिका असेल. चेन्नई सुपर किंग्सची तामिळनाडूमध्ये क्रिकेट अकॅडमी आहे. हाय परफॉर्मेन्स सेंटरकडून मुख्य संघाबरोबरच अकॅडमीतल्या खेळाडूंवर नजर ठेवली जाईल.
अश्विन चेन्नईकडून खेळणार?
इंडिया सिमेंट्सबरोबर जोडल्या गेल्यानंतर अश्विनने आनंद व्यक्त केला आहे. खेळाला पुढे नेण्यासाठी आणि क्रिकेट क्षेत्रात योगदान देणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट्य असल्याचं अश्विनने म्हटलं आहे. जिथून माझा आयपीएलमधला प्रवास सुरु झाला तिथे परत येऊन मी खुश असल्याचं अश्विनने म्हटलंय. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिग्गज खेळाडू फ्रँचाईजीबरोबर आल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. अश्विन पुढच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्साठी खेळणार असल्याचंही बोललं जात आहे. पुढच्या लिलावात चेन्नई अश्विवर बोली लावू शकतात.
राजस्थान अश्विनला रिटेन करणार?
आयपीएल 2025 हंगामात खेळाडूंचा मोठा लिलाव असणार आहे. रिटेंशन प्रक्रियेला अद्याप अंतिम स्वरुप देण्यात आलेलं नाही. पण प्रत्येकी फ्रँचाईजी जास्तीत जास्त चार खेळाडूंना रिटेन करु शकते. असं झालं तर राजस्थान रॉयल्सला अश्विनला संघात ठेवणं अशक्य होऊ शकतं. अश्विनने 2010 आणि 2011 आयपीएल हंगामात चेन्नईच्या जेतेपदात मोठी भूमिका बजावली होती.आर अश्विनने आयपीएलमध्ये 180 विकेट घेतल्या आहेत.