IPL Auction : इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. सर्वच फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. यावेळी लिलावात असे काही खेळाडू आहेत जे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. याचदरम्यान लिलावापूर्वी बीसीसीआयने भारतातील 5 खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. या लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व संघांना मेलद्वारे मोठी माहिती दिली आहे. BCCI ने लिलावापूर्वी अशा 5 भारतीय खेळाडूंची नावे दिली आहेत, ज्यांच्यावर IPL 2023 पूर्वी बंदी घातली जाऊ शकते. आयपीएल लिलावापूर्वी आलेल्या या बातमीने सर्व फ्रँचायझींची चिंतेत वाढ झाली आहे.
लिलावापूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत एक मोठे अपडेट दिले असून बंदी घालू शकणाऱ्या 5 खेळाडूंची नावेही नमूद केली आहेत. हे पाच खेळाडू संशयास्पद गोलंदाजीच्या वर्तुळात असून बीसीसीआय त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या सर्वांची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे तनुष कोटियन (Tanush Kotiya), रोहन कुनुमल (Rohan Kunumal) (केरळ), अपूर्व वानखेडे (Apoorva Wankhede) (विदर्भ), चिराग गांधी (Chirag Gandhi) (गुजरात) आणि रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) (महाराष्ट्र) हे पाच खेळाडू आहेत.
वाचा : IPL 2023 साठी आज खेळाडूंचा लिलाव, ऑक्शनसंबंधित सर्व माहिती इथे चेक करा
या पाच खेळाडूंमध्ये तनुष कोटियन (Tanush Kotiya) हे एक मोठे नाव आहे. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईला हैदराबादविरुद्ध विजय मिळवून देण्यात ऑफस्पिनर तनुष कोटियननेही मोलाची भूमिका बजावली होती. तनुष कोटियनने या सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. अशा स्थितीत लिलावात अनेक संघ या खेळाडूवर सट्टा खेळू शकतात, असे मानले जात होते.
आयपीएलमध्ये (IPL 2023) पहिल्यांदाच संशयास्पद गोलंदाजीची अॅक्शन समोर आलेली नाही. याआधीही 4 खेळाडूंवर संशयास्पद गोलंदाजीमुळे बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकचा मनीष पांडे, एमसीएचा अरमान जाफर, बंगालचा चॅटर्जी आणि महाराष्ट्राचा अझीम काझी यांच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये आधीच बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत सर्व फ्रँचायझींना या लिलावात अतिशय काळजीपूर्वक विचार करून या खेळाडूंवर सट्टा लावावा लागेल.