मुंबई: आयपीएल 2022 आणि मेगा ऑक्शनवर वाढत्या कोरोनाचं सावट आहे. मात्र यंदाच्या मेगा ऑक्शनची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी मोठ्या उत्साहात हे पार पडू शकतं. यंदा आयपीएलच्या मैदानात 10 संघ उतरणार आहेत. प्रत्येक संघाला 4 खेळाडू रिटेन करण्याची परवनगी आहे. त्यामुळे यावेळी मेगा ऑक्शन मोठा असणार यामध्ये शंकाच नाही.
या मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 7 वर्षांनी एक खेळाडू उतरणार आहे. त्याच्यावर बोली लावण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. अहमदाबाद आणि लखनऊ संघाचा कर्णधार देखील बनणण्याची शक्यता आहे. तसं झालं तर त्याला लॉटरीच लागली असं म्हणायला हरकत नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला दिल्ली संघाने रिटेन केलं नाही. तर दुसरीकडे अय्यर दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने बाहेर होता. त्यामुळे दिल्लीने ऋषभ पंतची कर्णधार म्हणून निवड केली. अय्यर यावर्षी दिल्ली सोडून मेगा ऑक्शनमध्ये आपलं नाव ठेवणार आहेत.
अय्यर आपलं नाव मेगा ऑक्शनसाठी देणार आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता अय्यरवर किती कोटींची बोली लागणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आरसीबीची नजर अय्यरवर आहे.
RCB, पंजाब किंग्स आणि KKR या तिन्ही संघांची नजर सध्या अय्यरवर आहे. तिघांमध्ये अय्यरवर बोली लावण्यावरून स्पर्धा होऊ शकते. कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर संघाला धडाकेबाज नेतृत्व करणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे RCB ची नजर अय्यरवर आहे.
दिल्ली कॅपिटल्सने 2015 मध्ये श्रेयस अय्यरला 2.5 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केलं होतं. आता 7 वर्षांनंतर हा खेळाडू पुन्हा एकदा मेगा ऑक्शनमध्ये उतरणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी चांगली राहिली होती. फायनलपर्यंत पोहोचवण्यात अय्यर यशस्वी झाला होता.
2021 च्या सुरुवातीला अय्यरला दुखापत झाली आणि त्याला दिल्लीच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. ऋषभ पंतला कर्णधारपद देण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात अय्यरकडे पुन्हा नेतृत्व आलं नाही. तो संघाकडून खेळला. त्यामुळे अय्यरने दिल्ली संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याच्याही चर्चा आहेत.