Ishan Kishan angry on Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड (Ind Vs Nz) यांच्यामध्ये तिसरा वनडे ( IND vs NZ 3rd ODI ) सामना खेळवला जातोय. यामध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 386 रन्सचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी किवींच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. मात्र टीम इंडिया फलंदाजी करत असताना ईशान किशन (Ishan Kishan) एका चुकीच्या कॉलचा शिकार झाला आणि विकेट गमावून बसला. यावेळी इशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तो रन आऊट झाला. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) त्याने विकेट सोडल्याचं दिसतंय.
आज चाहत्यांनी इशान किशनकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. टीम इंडियाच्या (Team India) ओपनर्सने चांगली सुरुवात केली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांची विकेट गेल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. मात्र अवघ्या 17 रन्सवर तो रनआऊट होऊन माघारी परतला. यावेळी स्वतःच्या चुकीचा राग त्याने विराटवर काढल्याचं दिसून आलं.
टीम इंडियाच्या 35 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर त्याने एक कव्हर ड्राइव शॉट खेळला. यावेळी फिल्डर हेन्री निकल्सने उत्तम फिल्डींग केली. यावेळी विराट कोहली आणि ईशान किशन यांच्यामध्ये योग्य पद्धतीने ताळमेळ बसला नाही आणि चुकीच्या कॉलवर तो विकेट गमावून बसला.
दरम्यान आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये परतत असताना ईशान किशन विराट कोहलीवर संतापलेला दिसला. किशान इतका संतापला होता की, पव्हेलियनमध्ये जात असताना विराट त्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र काहीही न ऐकता तो संतापाने निघून गेला. यावेळी त्याने एकदाही विराटकडे वळून पाहिलं नाही. इतकंच नाही तर जाताना रागाच्या भरात तो विराटला अपशब्द बोलून गेला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
very bad pic.twitter.com/TRkM5CAtr3
— Saddam Ali (@SaddamAli7786) January 24, 2023
तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तब्बल 3 वर्षानंतर वनडेमध्ये शतक झळकावलं आहे. रोहितने 85 बॉल्समध्ये 101 रन्सची खेळी केली. तर रोहितसोबत ओपनिंग पार्टनर म्हणून आलेल्या शुभमन गिलनेही तुफान फलंदाजी केली. याशिवाय हार्दिक पंड्यानेही अर्धशतक झळकावलं. विराट कोहली 36 तर शार्दुल ठाकूरनेही 17 बॉल्समध्ये 25 रन्सची खेळी केली.