Ishan Kishan Bihar Jharkhand: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) दमदार डबल सेंच्यूरी लगावली. 24 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीने ईशानने फक्त 126 बॉलमध्ये दुहेरी शतक (Double century) ठोकलं आणि बांग्लादेशच्या गोलंदाजी दाणादाण उडवली. त्यानंतर आता क्रिडा विश्वात ईशान किशनची चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) देखील ईशानची बॅट तळपल्याचं पहायला मिळतंय. केरळविरुद्धच्या सामन्यात ईशानने 132 धावांची खेळी केली. मात्र, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगल्याचं पहायला मिळतंय. (ishan kishan tells whether he belongs to bihar or jharkhand know his reply after double century odi ind vs ban marathi sports news)
बिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण?, असा सवाल आता सोशल मीडियावर (Social Media) विचारण्यात येतोय. ईशानची बॉडी लॅग्वेज आणि बोली भाषेमुळे ईशान बिहारी (Bihari) असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहीजण तो झारखंडचा (Jharkhand) असल्याचा दावा करत आहेत. सोशल मीडियावर याचे मिम्स (memes) देखील शेअर होताना दिसत आहे. त्यावर आता स्वत: ईशान किशनने उत्तर दिलंय.
ईशान किशन गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ईशानने काही प्रश्नांची उत्तरं दिली. तुझ्याबद्दल चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चा होते की तू बिहारी आहे की झारखंडी? या प्रश्नावर बोलताना ईशान (Ishan Kishan) म्हणतो...
माझा जन्म बिहारमध्ये झालाय. मीही तिथंच लहानाचा मोठा झालोय... पण झारखंडमध्ये खूप क्रिकेट (Jharkhan Cricket) खेळलो आहे. येथूनच मला भारतीय संघात सामील होण्याची संधी मिळाली. मला आवडणारे लोक बिहार (Bihar) आणि झारखंड (Jharkhand) या दोन्ही राज्यांतील आहेत. दोन्ही राज्यांवर प्रेम आहे आणि चाहत्यांचे प्रेम देखील मिळालं. माझे कुटुंब अजूनही बिहारमध्ये राहते. मित्र दोन्ही ठिकाणी आहेत. मग मी बिहारी की झारखंडी? हा प्रश्न आवश्यक नाही, असं ईशान किशन (Ishan Kishan) म्हणतो.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ईशान किशनला टीम इंडियामध्ये (Team India) संधी देण्यात आली नव्हती. अनेकदा त्याला संघात सामील करण्यात आलं नव्हतं, तर वर्ल्ड कपमध्ये देखील त्याला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आता ईशानने डबल सेंच्यूरी झळकवत टीममधील स्थानावर दावा ठोकलाय. त्यामुळे आता ईशानला दौऱ्यात संधी मिळेल की नाही? अशी चर्चा होताना दिसत आहे.