मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची नाचक्की केली. जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉर्डच्या ओव्हरमध्ये 35 रन्स लुटले. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ऋषभ पंतने जसप्रीत बुमराहला लगावलेला चौकार खूप स्पेशल ठरला होता.
जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट खेळत असताना बुमराहचा तोल गेला होता. यावेळी जसप्रीत बुमराह हिट विकेट होण्यापासून थोडक्यात बचावला. क्षणभर असं वाटलं की, त्याचा पाय स्टंपवर लागेल. पण जसप्रीत बुमराहने चाणाक्षपणा दाखवला आणि स्वतःचा पाय स्टंपवर लागण्यापासून वाचवलं.
जसप्रीत बुमराहने डिपमिड विकेटच्या क्षेत्रात या बॉलवर 4 रन्स घेतले. जसप्रीत बुमराहला या अवस्थेत पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेला विराट कोहलीला हसू आवरता येत नाही. यावेळी विराट आणि रविंद्र जडेजा खो-खो हसत होते. दरम्यान यावेळी तर नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजनेही हसून बुमराहला मिठी मारली.
— ParthJindalClub (@ClubJindal) July 2, 2022
जसप्रीत बुमराह टेस्टमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला. यासह बुमराहने वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसंच ब्रॉड कसोटीत क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स लुटवणारा गोलंदाज ठरला. ब्रॉडने या ओव्हरमध्ये एकूण 8 बॉल फेकले. ब्रॉडने नो आणि वाईड बॉल टाकल्याने त्याला 2 अतिरिक्त बॉल फेकावे लागले.