KL Rahul On Kuldeep Yadav: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशवर 3 गडी राखून विजय मिळवला आहे. रोमांचक राहिलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवून दोन सामन्याची मालिका (Ind vs Ban Test Series) खिश्यात घातली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं (Team India) कौतूक होताना दिसत आहे. अशातच आता कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) मोठं वक्तव्य केलंय. (KL Rahul breaks silence after dropping Kuldeep Yadav in Ind vs Ban 2nd test marathi news)
पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता असताना कुलदीपला पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. कर्णधार केएल राहुलसह (KL Rahul) संघ व्यवस्थापनावर बरीच टीका झाली होती. मात्र, राहुलने सामन्यानंतर कुलदीपला न खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला, असं म्हटलं आहे.
मला या निर्णयाचा मला कोणताही पश्चाताप नाही. तो योग्य निर्णय होता. विकेट्सवर नजर टाकली तर आमच्या वेगवान गोलंदाजांनीही खूप विकेट घेतल्या आणि त्यांना खूप मदत मिळाली. मैदानात खूप विसंगत उसळी होती. या मैदानावर वनडे खेळण्याचा आमचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतल्याचं केएल राहुलने (KL Rahul On Kuldeep Yadav) म्हटलं आहे.
दरम्यान, 'इम्पॅक्ट प्लेअर'चा नियम (Impact player) असता तर कुलदीपला दुसऱ्या डावात संधी द्यायची माझी नक्कीच इच्छा होती, असंही राहुल यावेळी म्हणाला आहे. आदल्या दिवशीची खेळपट्टी पाहून आम्हाला वाटलं की, वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना मदत होईल. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला होता, असंही के एल राहुल (KL Rahul) म्हणाला. राहुलच्या निर्णयानंतर अनेकांनी टीका केली होती, त्यावर राहुलने आपली बाजू स्पष्ट केली आहे.