सिडनी : आज टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरूद्ध आपला दुसरा सामना खेळतेय. पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह आणखी वाढला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फलंदाजी केली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर के.एल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ 9 रन्स करणं शक्य झालं.
दरम्यान या सामन्यात के.एल राहुलला नशिबाने साथ दिली नाही. झालं असं की, अंपायरने त्याला LBW आऊट दिलं, मात्र बॉल विकेटवर लागला नव्हता. अशा परिस्थितीत जर के.एल राहुलने रिव्ह्यू घेतला असता तर त्याला नॉट आऊट करार दिला गेला असता.
यावेळी केएल राहुलनेही यासंदर्भात कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा केली. परंतु दोघांनाही हा बॉल थेट स्टंपवर जात असल्याचं जाणवलं. यानंतर रिप्ले पाहिल्यावर बॉल स्टंप मिस होत असल्याचे स्पष्टपणं दिसून येत होतं. दरम्यान याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
के.एल राहुलचा सध्या फ्लॉप शो सुरु आहे आणि हे टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. राहुल पाकिस्तान विरूद्धही फेल ठरला होता. त्या सामन्यात त्याने फक्त 4 रन्स केले होते. तर आता नेदरलँड्स विरूद्ध त्याने फक्त 9 रन्स केलेत. त्यामुळे वर्ल्डकपसाठी के.एल राहुल कधी फॉर्ममध्ये येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
भारताची प्लेइंग 11: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह
नीदरलँड्सची प्लेइंग-11: विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बॅस डे लीड, कॉलिन एकरमॅन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स, टीम प्रिंगल, लोगन वॅन बीक, शहरीज़ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल वेन मीकरेन