मुंबई : 7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 पर्व रंगणार आहे. दोन वर्ष आयपीएलमध्ये बॅन असलेली चैन्नई सुपरकिंग, मुंबई इंडियंस विरूद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी एक रंगतदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळा रंगणार आहे.
बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक बडे सितारे या सोहळ्याला हजेरी लावणार अशी माहिती दिली होती. मात्र बजेटच्या अभावी हॉलिवूडमधी सितारे या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे.
पूर्वी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला 50 कोटींचं बजेट देण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता 30 कोटीचं बजेट देण्यात आलं आहे. संचालन परिषदेने हा कार्यक्रम 18 कोटींमध्ये आयोजित केला आहे. त्यामुळेच लेडी गागा, ब्रायम अॅडम्स, कॅट पेरी या सारखे पॉप गायक झळकणार नाहीत.
बजेट कमी असल्याने हॉलिवूड कलाकारांचा समावेश करण्यात येणार नाही. अशी माहिती आयपीएल चेअरमॅन राजीव शुक्लांनी दिली आहे. हॉलिवूड कलाकार नसले तरीही बॉलिवूड सितारे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
एका फूटबॉलमॅचमध्ये खेळताना रणवीर सिंहला इजा झाली. यामुळे डॉक्टरांनी रणवीरला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डांससारख्या शरीराला थकवणार्या अॅक्टिव्हिटींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रणवीर सिंहऐवजी अभिनेता ऋतिक रोशन झळकण्याची शक्यता आहे. 2015 साली ऋतिक आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये झळकला होता. त्याच्या सोबतीला वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस, परिणीती चोप्रा झळकणार आहे.