मुंबई : जगभरात आज मोठ्या उत्साहाने फादर्स डे (Father's day 2021) साजरा केला जात आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची भूमिका ही महत्वाची असते. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपल्या वडिलांबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) आपल्या वडिलांच्या रमेश तेंडुलकर (Ramesh Tendulkar) यांच्या आठवणींना फादर्स डे च्या निमित्ताने उजाळा दिला आहे. सचिनने एक व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओद्वारे सचिन व्यक्त झाला आहे.
काय आहे व्हीडिओमध्ये?
सचिनने त्याच्या वडिलांच्या लहानपणीची एक खास आठवण शेअर केली आहे. सचिनने या व्हीडिओत झोपाळ्याचा व्हीडिओ शेअर केलाय. या झोपाळ्याशी सचिनच्या आणि त्यांच्या वडिलांच्या बाळपणीच्या आठवणी आहेत. हा झोपळा आधी पाळणा होता. याच पाळण्यात सचिनचे वडील लहानाचे मोठे झाले. त्यानंतर वडिलांची आठवण म्हणून सचिनने या पाळण्याचं रुपांतर झोपाळ्यात केलं. वडिलांची आठवण म्हणून सचिनने हा झोपाळा सांभाळून ठेवला आहे. सचिन जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा तेव्हा या झोपाळ्यावर बसतो. यामुळे त्याच्या मनात असलेले नकारात्मक विचार नाहीसे होतात.
We have some things that act as time machines for us. A song, a smell, a sound, a flavour.
For me, it's something from my Father's childhood that always takes me on a trip down memory lane.
On #FathersDay I want to share that special place with you all.
Miss you always, Baba. pic.twitter.com/I9LXa7wgMK— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 20, 2021
सचिन काय म्हणााला?
"आपल्याकडे काही अशा वस्तू असतात, ज्या आपल्याला मागे भूतकाळात घेऊन जातात. माझ्याकडे माझ्या बाबांची खास आठवण आहे. फादर्स डे निमित्ताने त्याच्याबाबत तुम्हाला सांगणार आहे. हा एक पालणा आहे. या पाळण्यात माझे वडील मोठे झाले. यावरुन हा झोपाळा किती जूना आहे, हे स्पष्ट होईल. हा पाळणा झोपाळ्यात बदलल्यास याचा उपयोग होईल, असं आईने म्हटलं. त्यानंतर याचं झोपाळ्यात रुपांतर केलं. माझ्या डोक्यात जेव्हा उलट सुलट विचार येतात, तेव्हा मी यावर बसतो. यामुळे मला एक ताकद मिळते. मनातले नकोसे विचार नाहीसे होतात", असं सचिनने स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :
अनुष्का आणि वामिका बेडरूमच्या बाल्कनीतून पाहताय विराटला, शेअर केला फोटो
WTC Final, Day 3 Live Updates | न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात, टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवे मैदानात